Slide 1 of 1
दुर्गरक्षक फोर्सच्या वतीने हुतात्मा राजगुरू यांच्या वाड्याची साफसफाई !
- शासन व प्रशासनाच्या प्रत्यक्षात दुर्लक्षामुळे राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे राष्ट्रीय स्मारक असलेल्या राजगुरू यांचे जन्मस्थळ व निवासस्थान असलेल्या भीमा नदी पात्रालगत राजगुरू वाड्याच्या तटबंदीला मोठमोठी झाडे,झुडपे वाढून वाड्याच्या तटबंदीची पूर्णपणे दुरवस्था झालेली होती.
- याची दखल घेऊन देशाच्या स्वातंत्र्य लढयात मुख्य भूमिका असणारे शहीद भगतसिंग,सुखदेव यांच्या सोबत असणारे अवघ्या युवक वयात ज्यांना फाशी दिली गेली ते शहीद राजगुरू यांच्या पुणे जिल्ह्यातील असणाऱ्या राजगुरुनगर येथील जन्मस्थळ निवासस्थान प्राचीन वाड्याच्या रक्षणासाठी व सुरक्षिततेसाठी राजगुरू स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने दुर्गरक्षक फोर्स समितीच्या माध्यमातून राजगुरू वाडा संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
- यामध्ये वाड्याच्या तटबंदीला व इतर ठिकाणी वाढलेली मोठमोठी झाडे,झुडपे दुर्गरक्षक फोर्स समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः आपला जीव धोक्यात घालून तोडल्याने राजगुरू वाड्याने मोकळा श्वास घेतला.तसेच वाड्याच्या परिसरात झालेल्या दुरवस्थेची नीटनेटकी स्वच्छता करण्यात आली.या संरक्षण स्वच्छता मोहिमेमुळे वाड्याची तटबंदी व परिसर स्वच्छतेने उजाळला.
- या मोहिमेदरम्यान दुर्ग रक्षक फोर्स समितीचे संस्थापक अध्यक्ष जयकांत शिंक्रे,मुख्य मोहीम प्रमुख शिवकन्या वर्षा चासकर,नियोजन सहकार्य पुणे विभाग प्रमुख योगेश गायकवाड,छत्रपती संभाजी महाराज नगर विभाग प्रमुख दत्ता वाघ,नाशिक विभाग सदस्य सागर पवार,संपर्क विभाग प्रमुख जानवी एडवणकर,बीड जिल्हा विभाग प्रमुख भरत पघळ,दुर्ग रक्षक अतिष मोहिते,शिवकन्या त्रिषा मोहिते,दुर्ग सेवेकी पूनम मोहिते,मुख्य सदस्य राज पोतदार,मुख्य सदस्य शिवराम काळंगे,दुर्ग सेविका अमृता काशिद यांनी सहभाग घेऊन अथक प्रयत्न परिश्रम घेऊन ही राजगुरू वाड्याची संरक्षण स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवून एतिहासिक स्थळांच्या सुरक्षितता जपवणुकीचा नवा आदर्श समाजासमोर मांडला आहे.
- हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या नावाने संपूर्ण शहर राजगुरुनगर म्हणून ओळखले तर जाते पण त्यांच्या निवासस्थानी मात्र जाण्याची इच्छा देखील कोणाला होत नाही.इतिहासात दोन ओळींमध्ये शिकवले जाणारे राजगुरु आणि आता त्यांचा निवासी वाडा दोन्हीही दुर्लक्षित का? आपल्याकडे असणारी खरी प्राचीन श्रीमंती ओळखून तिचे जतन करणे गरजेचे आहे. -शिवकन्या वर्षा चासकर,मुख्य मोहीम प्रमुख-दुर्गरक्षक फोर्स महाराष्ट्र राज्य].
Tags:
2
134 Views
1 comment
Maruti Thaware
Khup Chan patrkar saheb