Slide 1 of 1 

YBI कडून मराठमोळ्या उद्योजकाचा जागतिक पुरस्काराने गौरव
YBI कडून मराठमोळ्या उद्योजकाचा जागतिक पुरस्काराने गौरव
• भारतीय युवा शक्ती ट्रस्ट पुरस्कृत तरूण उद्योजक निरंजन ओव्हाळ यांना उद्योजक कोविड रेजिलिअन्स प्रवर्गात "युथ बिझिनेस इंटरनॅशनल ग्लोबल' संस्थेच्या वतीने "युवा उद्योजक २०२२' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
• नेदरलँड येथे झालेल्या या कार्यक्रमात ओव्हाळ यांच्या वतीने भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त लक्ष्मी वेंकटरमण वेंकेटेशन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
• स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व उद्योगासाठी विशेष मार्गदर्शन असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
• निरंजन ओव्हाळ यांनी भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या माध्यमातून पुणे येथे सिम्फोर्ज इंजिनिअरिंग हा व्यवसाय सुरू केला आहे.
• त्यांनी कोविड कालावधीत अडचणींचा सामना करीत आपला उद्योग यशाच्या शिखरावर नेला.
• लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांना व्हिडिओ गेम खेळण्याची सवय लागली. परंतु त्यापैकी अनेक लोकांना दर्जेदार महागड्या रेसिंग गेम खेळणे परवडणारे नव्हते. निरंजनने लोकांच्या ह्याच समस्येवर मात करण्याचे ठरवले. त्याला ह्या क्षेत्रातील संधी खुणवू लागली. अथक परिश्रम, संशोधन करून त्याने ऑटो रेसिंग उत्पादकांना अधिक थरारक होईल असे रेसिंग गिअर कमी किमतीत उपलब्ध करून दिले. ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना दर्जेदार रेसिंग गेम खेळणे शक्य झाले.
• उद्योजक ओव्हाळ यांची सिम्फोर्ज इंजिनीअरिंग ही भारतातील पहिली आणि एकमेव रेसींग गियर बनवणारी उत्पादक कंपनी आहे.
• विद्यार्थी वर्ग, अल्प उत्पन्न असणारा युवक, शैक्षणिक संस्था याना विशेष सवलतीत सिम फोर्ज आपली उत्पादने उपलब्ध करून देत आहे.
Tags:
2
75 Views
1 comment
KRISHNAKANT KOBAL
निरंजनजी अभिनंदन !